चिमणी....(मनाशी भिडलेला प्रसंग)

                      चिमणी
                      काल अचानक रूम मध्ये चिमनीचा मोठ्याने आवाज येऊ लागला. खरंतर मी त्याच आवाजानेच जागा झालो , उठलो अन त्या आवाजाचा शोध घेऊ लागलो. काही काळात तो आवाज आणखीनच वाढू लागला. अखेर त्या आवाजाची दिशा सापडली, माझ्या रूमच्या पंख्यावरून तो आवाज येत होता. तो एका चिमनीची किलबिल होती (किलबिलीपेक्षा तो खूपच कर्कश वाटला). 

                पंख्यावर एक काळी चिमणी बसली होती(फँड्री मधली तर नसावी 😅). तिच्या पाठीवर पूर्णपणे काळा रंग होता आणि तो खूप चमकत ही होता . तिच्या पंखांवर थोडासा पिवळा रंग शिंपडल्या सारखा होता तो अगदी ऊठाळून दिसत होता. आणि शेपटी जवळ हिरवा रंग उमटून दिसत होता. चोचीचं वर्णन करायचं झालं तर इंच दोन इंच चोच व शेंड्यावर खालच्या बाजूस वळण मारलेलं. बघता क्षणीच खूप कुतूहल वाटलं आणि तिच्याकडे पाहतच राहावं अस वाटलं, करण एवढ्या जवळून कधीच त्या प्रकारची चिमणी पाहिलेली नव्हती(पाहण्याचा प्रयत्न केला परंतु जवळ जातास त्या उडुन जातात...). 
            

                              ती चिमणी खूप जास्तच आवाज करत होती व त्या पंख्याभोवती घिरट्या घालण्यास तिने सुरुवात केली. घिरट्या घालायची मधेच थांबायची व पंख्यावर येऊन बसायची असं तिने सतत चालू केलं. मला वाटलं तिला रूमच्या बाहेर जायचं असेल बहुदा चुकून आत अली असेल बिचारी व बाहेर जाण्यास रास्ता सापडत नसेल म्हणून ओरडत असेल . म्हणून मी माझ्या रूम ची खिडकी पूर्णपणे उघडली. परंतु तरीही तिला बाहेर जायचं कळेना .
मग मी खिडकी उघडीच ठेवली व कॉलेजला जायला उशीर होत होता म्हणून आवरायला गेलो. आवरून आल्यावर पाहिलं परंतु तरीही ती चिमणी गेली नव्हती मग मी खिडकी उघडी ठेवूनच कॉलेजला गेलो .

                     संध्याकाळी येईला जरा उशिरच झाला. आल्यानंतर फ्रेश होऊन जरावेळ बाहेर फिरायला गेलो व आल्यावर नंतर जेवण करून रूम मध्ये जाऊन अभ्यासाला बसलो. अभ्यास करत करत रात्रीचे ११ वाजले , संपूर्ण परिसरात शांतता एवढी की सुई पडल्यावरही तिचा आवाज कानाला स्पष्टपणे ऐकू येईल. एवढ्या संपूर्ण दिनक्रमात मी त्या चिमणीबद्दल विसरूनच गेलो होतो.
            
           रात्रीचे ११:३० वाजले होते , अचानक पंख्यावरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला , मी जरा दकलोच(किंबहुना घाबरलोच). पाहतो तर काय!!! अक्षरशः ती काळी चिमणी पंख्यावरून खाली पडली होती. तिला पाहताच पूर्ण अंगावर काटे आले , अंगातून घाम येऊ लागला, काय करावं तेही लवकर सुचेना , मनात विचार आला " मेली तर नसेल ना?? " मग धाडस करून उठलो बाहेरच्या खोलीतून पाणी घेऊन आलो व धाडस करून त्या चिमणी ला हातावर उचलून घेतलं व तिच्या तोंडात चोचेद्वारे पाणी सोडलं , मग तिने थोडी मान हलवली . तिच्या अंगात थोडा त्राण आलेला पाहून माझ्या मनाला उभारी आली, थोड्या वेळेने ती पूर्णपणे शुद्धी वर आली व परत तिची किलबिल सुरू झाली 😊
       थोड्यावेळेने तिला हातात पकडून खिडकीच्या बाहेर सोडले व लगेच भुर करून उडून गेली, उडून गेल्यावर मी खूप आनंदी होतो 😊 .

             मग मी असाच एकटा विचार करत बसलो की ही संपूर्ण घटना कशामुळे घडली. 
सकाळी कॉलेज ला जाताना मी पाणी व काहीतरी खायला ठेवलं असत तर हा संपूर्ण प्रसंग घडलाच  नसता.

 त्या पुढे मी असा निर्धार केला की प्राण्यांना व पक्षांना अन्नाची व पाण्याची सोय करायची व अजूनही दिसेल तिथे व शक्य असेल तिथे मी सोय करतोय व मला असे वाटते की आपण ही सोय करावी कारण त्यांचं कुणीच नसतं!!!
            

Comments

Post a Comment