Posts

चिमणी....(मनाशी भिडलेला प्रसंग)

Image
                      चिमणी                       काल अचानक रूम मध्ये चिमनीचा मोठ्याने आवाज येऊ लागला. खरंतर मी त्याच आवाजानेच जागा झालो , उठलो अन त्या आवाजाचा शोध घेऊ लागलो. काही काळात तो आवाज आणखीनच वाढू लागला. अखेर त्या आवाजाची दिशा सापडली, माझ्या रूमच्या पंख्यावरून तो आवाज येत होता. तो एका चिमनीची किलबिल होती (किलबिलीपेक्षा तो खूपच कर्कश वाटला).                  पंख्यावर एक काळी चिमणी बसली होती(फँड्री मधली तर नसावी 😅). तिच्या पाठीवर पूर्णपणे काळा रंग होता आणि तो खूप चमकत ही होता . तिच्या पंखांवर थोडासा पिवळा रंग शिंपडल्या सारखा होता तो अगदी ऊठाळून दिसत होता. आणि शेपटी जवळ हिरवा रंग उमटून दिसत होता. चोचीचं वर्णन करायचं झालं तर इंच दोन इंच चोच व शेंड्यावर खालच्या बाजूस वळण मारलेलं. बघता क्षणीच खूप कुतूहल वाटलं आणि तिच्याकडे पाहतच राहावं अस वाटलं, करण एवढ्या जवळून कधीच त्या प्रकारची चिमणी पाहिलेली नव्हती(पाहण्याचा प्रयत्...